
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : खोट्या बातम्या पसरवून मराठी एकीकरण समितीची समाजात बदनामी केल्याप्रकरणी दबंग खबरे DK News या युट्युब/फेसबुक न्यूज चॅनेलवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आज पुन्हा एकदा करण्यात आली.
समितीचे सचिव कृष्णा जाधव आणि खजिनदार प्रमोद पार्टे यांनी DCP Zone 1 डोईफोडे साहेब यांना याबाबत एक सविस्तर लेखी निवेदन सादर केले.
समितीचे म्हणणे आहे की, राज्यभर समाजासाठी कार्यरत असणाऱ्या नोंदणीकृत संस्थेबद्दल कोणतेही पुरावे नसताना, समितीची बाजू न तपासता DK News या चॅनेलने एकतर्फी आणि दिशाभूल करणारी बातमी प्रसारित केली. यामुळे संस्थेची तसेच पदाधिकाऱ्यांची समाजात मानहानी झाली असल्याचा आरोप समितीने केला आहे.
“DK News चॅनेलच्या मालकावर कारवाई झाल्याशिवाय समिती शांत बसणार नाही,” असे खजिनदार प्रमोद पार्टे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, समाजात चांगले काम करणाऱ्या संस्थांचे खच्चीकरण व बदनामी करणारी अशी युट्युब चॅनेल त्वरित बंद करण्यात यावीत.
प्रमोद पार्टे यांनी असेही नमूद केले की—
चॅनेलच्या मालकाने बातमी कोणाच्या सांगण्यावरून दिली,
कोणी तक्रार केली,
कोणाची नावे घेतली,
याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
“जेव्हा कोणतेही पुरावे नाहीत, तक्रारदार नाही, माहिती नाही… तरीही एकतर्फी बातमी दिली गेली. त्यामुळे ज्यांच्या सांगण्यावरून ही बातमी प्रसारित झाली, त्यांनाही सह-आरोपी करण्यात यावे,” अशी मागणीही समितीने निवेदनात केली आहे.
पोलिसांकडून पुढील कारवाईची प्रतीक्षा सुरू आहे.
मराठी मानसाआता तरी गेम समज अन्यथा तुझ्या घरात ही यांचेच चालणार
अपलक गद्दार आहेत म्हणून अधिक दक्षतेने यंदा सावध राहवे व मतदान करावे