
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा.
मुंबई – मराठी एकीकरण समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर आमदार अमित साटम यांच्या कार्यालयावरील फलक मराठीत लावण्यात आला आहे. यामुळे परिसरातील मराठी भाषिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
मराठी एकीकरण समितीने दिलेल्या निवेदनानुसार, मुंबई पालिकेने हा बदल स्वतःहून करायला हवा होता; मात्र तक्रार दाखल केल्यानंतरच फलक मराठीत करण्यात आल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली आहे. तरीही अखेर मराठीला योग्य मान्यता मिळाल्याचा आनंद असल्याचे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.
या प्रकरणी गोवर्धन देशमुख यांच्यासह जवळपास २०० मराठी शिलेदारांनी मुंबई महानगरपालिकेकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पालिका सुविधाकरांनी हा फलक मराठी भाषेत बदलण्यात आल्याची अधिकृत माहिती लेखी स्वरूपात समितीला कळवली.
मराठी भाषेच्या सन्मानासाठी पुढेही अशाच पद्धतीने चळवळ सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मराठी एकीकरण समितीने स्पष्ट केले आहे.
उत्तम
Gd thing
Great