प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : न्यायालयाचा कबुतरखाना बंदी हुकूम असताना,जैन समाजाने तो हुकूम तोडताना हातात शस्त्रे घेऊन जो हैदोस व धुडगूस दादर कबुतरखान्याला घातला!त्याचा जाब विचारण्यासाठी आज मराठी एकीकरण समितीचा छोटा जमाव आज दादर येथील स्थानिक पोलिस ठाण्यात निवेदन देण्यासाठीजाणार होता.त्यासाठी समितीची माणसे दादर कबुतरखान्याजवळ जमले होते.त्यावेळेस पोलिसांनी या जमावाची अचानक धरपकड सुरू करून,त्यांच्या विरुद्ध जेलभरो आंदोलन सुरू केले व ह्या जमावाचा डाव हाणून पडण्याचा प्रयत्ना केला. त्यावेळेस म. ए. क. समितीचे नेते ह्यांनी नाराजी व्यक्त करत,जैन धर्माच्या लोकांनी न्यायालयाचा अवमान करून!हुकूम लाथाडत हातात शस्त्रे घेऊन जो धिंगाणा घातला, त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. पण म ए समितीचे शांततेत व लोकशाहीच्या आधारे चाललेल्या ह्या आंदोलनावर त्वरित पोलिसी कारवाई का?हा दूजाभाव का?असा सवाल नेत्यांनी केला. तुम्हाला भूमिपुत्र नकोत?न्यायालयाचा अवमान करून हातात शस्त्रे घेतलेला समाज मतांच्या कार्यासाठी चालतो.अस परखड मत त्यांनी टी वी वर मुलाखत देताना मांडले.हे सर्व प्रत्यक्षात जनतेने पाहिलेलं आहे.आज ह्या कारवाईने भूमिपुत्र नाराज आहे.अशा कृतीने भाजपा आज मराठी जनतेचा रोष ओढवून घेत आहे.कारण परप्रांतीयांनी भाजपला निवडून दिलं आहे!असा समज सत्तेत असलेल्यांचा आहे.याचा अर्थ मराठी माणसांनी बी जे पी ला मतदान केलंच नाही का?हा सवाल भूमिपुत्रांचा देवेंद्रजींना आहे.हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही निवडून यायचे आणि भूमिपुत्रवर अन्याय करायचे व त्यांना आंदोलनासाठी, मोर्चा काढण्यासाठी परवानगी द्यायची नाही.म्हणजे आपले बेगडी हिंदुत्व व खोटारडे मराठी प्रेम लोकांना आता कळलेल आहे.आता मात्र फडणवीसची हा मराठी समाज तुमच्या अशा अत्याचाराने जागा झालेला आहे.तो येणाऱ्या काळात भाजपा विरुद्ध दंड थोपटून उभा राहणार आहे.तोही भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार कार्यासाठीच!तर अशा परप्रांतीय लांगुलचालनाने आपणच आपल्या पायावर धोंडा पडून घेणार आहात.तुम्हाला आता दुजाभावाचा मापदंड द्यावाच लागणार आहे.पण कदाचित ईव्हीएम मशीनच्या जोरावर आपण निवडून यालही?पण जनमत हे आपल्या विरोधात राहणार हे लक्ष्यात ठेवा! हा मराठी मनाचा कौल आहे.
Nyay vhayla have
Justice must prevail