
File photo
प्रतिनिधी :सुरेश बोरले
मुंबई,कला ही उपजत असते किंवा घराणेशाहीने वारसाने आपल्याकडे येते. पण कोणत्याही प्रकारचे सहाय्य नसताना, कोणताही माणूस,त्या कलेत वाकबगार होतो, निषणांत होतो, त्यावेळेस ती गोष्ट विशेष असते.स्वतःच्या मेहनितीने, जिगरीने कोणी माणूस कला, क्रीडा आणि सामाजिक काम आत्मसात करतो व त्या व्यक्तीकडून अजूनही लोकांची काहीतरी अपेक्षा असते, पण तो अचानक स्वर्गवासी होतो,तो धक्का मात्र सगळ्यांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही! असेच एक महाराष्ट्राचे लाडके,
मराठी कला दिग्दर्शक, नितीन देसाई,आज अचानक कैलासवासी झाले. हा सहन न होणारा झटका आहे. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटाचे व दूरचित्रवाणी लोकप्रिय मालिकांचे ,ज्यांनी कला दिगदर्षण केलेलं आहे.ज्यांनी 26 जानेवारीला होणाऱ्या सैन्य कावयातीत,राजपथ दिल्लीला, आपल्या महाराष्ट्राची झाकी! राज्याची सुबत्ता सफलता प्रतिकृती पेश केली व अनेक पारितोषिके राज्यासाठी मिळवली.त्यांनी हिंदी चित्रपटातील भव्य दिव्य सेट्स बनवले व त्या चित्रपट यशस्वी करण्यात, त्यांचा मोठा हात होता.असे अकल्पित कला दिग्दर्शक,नितीन देसाई! यांनी आपल्या कर्जत येथील एन डी स्टुडिओत आत्महत्या करून!आपली इहलोक यात्रा संपवली. अतिशय खेद जनक बातमी आहे. त्यांच्या अचानक जाण्याने, बॉलिवूड व दूरचित्रवाणी जगतातील लोक हळ हळत आहेत. कारण अशा माणसाच अचानक निघून जाणे हे कोणत्याही कला क्षेत्रांत न परवडणारे आहे. ही एक न भरणारी पोकळी निर्माण झालेली आहे. एक न बुजणार खिंडार पडलेल आहे.त्यांच्या मृत्यूच कारण काहीही असो, माणूस परम शिखरावर असताना, त्याच निघून जाणे हे न पडणार असतं. त्यांनी आपल्या असंख्य कुंचल्यानी,आपली कला लोकांसाठी साकारली, आत्महत्येचा कारण काहीही असो! पण त्यांचं अचानक जाण!हे सिनेसृष्टीत व मनोरंजन सेवेला,पोरकेपण आहे. त्यांनी जनसेवेला कला दिग्दर्शकाच्या माध्यमातून दिलेली सेवा, नेहमीच लक्षात राहील.शिवाय त्यांनी अनेक वैयकतिक पारितोषिकेही मिळवलेली आहेत. ह्या रम्य आठवणी हीच त्याची खरी श्रद्धांजली 💐💐💐💐