
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज मनःपूर्वक अभिनंदन केले. प्रतिकूल परिस्थितीत लढत देत मिळवलेले हे यश गौरवास्पद असून, त्याचे खरे मानकरी तुम्ही सर्वच आहात, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यापुढील काळात मुंबईच्या हितासाठी अधिक मजबुतीने, एकजुटीने आणि जबाबदारीने काम करूया, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी सौ. रश्मी वहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते, उपनेते, सचिव, विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.