महिला दिनानिमित्त निबंध स्पर्धा..

Share

एसएमएस-प्रतिनिधी – उत्कर्ष बोर्ले.

मुंबई : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सन १९८२ पासून समिती देशभर जनप्रबोधनाचे कार्य करत असून महाराष्ट्र जादूटोणा व काळी जादू प्रतिबंधक कायदा याच्या प्रचार-प्रसारासाठीही सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये सामाजिक जाणीव व प्रबोधनाची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी सहभागी व्हावे, तसेच इतरांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन समितीने केले आहे.
निबंधासाठी विषय (एकच विषय निवडावा)
महिला दिनाचे महत्त्व
स्त्रिया आणि अंधश्रद्धा
सावित्रीबाई फुले यांचे समाजकार्य
स्त्री संतांचे प्रबोधन कार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रियांसाठीचे योगदान
आर्थिक साक्षरता आणि स्त्रिया
माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी महिला
निबंध मराठी किंवा हिंदी भाषेत लिहिता येणार असून स्पर्धा दोन वयोगटांमध्ये होणार आहे.
गट १: वय वर्षे १६ पर्यंत (शब्दमर्यादा ५०० ते ८००)
निबंध ९०७५२ ६६४४४ या क्रमांकावर दादाजी यशवंतराव यांना पाठवावा.
गट २: वय वर्षे १६ पुढे (शब्दमर्यादा १००० ते १५००)
निबंध ७४९०३ ०२७४० या क्रमांकावर नीता डुबे यांना पाठवावा.
सर्व निबंध पीडीएफ स्वरूपात १ मार्च २०२६ रोजी रात्री ९.०० वाजेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवावेत. निबंधासोबत वयोगट, पूर्ण नाव, पत्ता व संपर्क क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असून प्रत्येक सहभागीला सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल. पारितोषिक वितरण सोहळा ८ मार्च २०२६, रविवार रोजी दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिला दिन तसेच सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे.
समाजप्रबोधनाच्या या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Share

One thought on “महिला दिनानिमित्त निबंध स्पर्धा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *