प्रतिनिधी :मिलन शहा
नवी दिल्ली : उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दिल्लीतल्या विशेष न्यायालयांना माजी आमदार आणि माजी खासदारांविरुद्धचे खटले ऐकण्याची परवानगी दिली आहे. सीपीसीआर कायदा, 2005 आणि पोक्सो कायदा, 2012 अंतर्गत असलेले गुन्हे आता या विशेष न्यायालयांमध्ये ऐकले जातील. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पाठवलेला प्रस्ताव उपराज्यपालांनी मंजूर केला. याआधी या न्यायालयांत केवळ विद्यमान आमदार-खासदारांचे खटले चालत होते.राऊस अव्हेन्यू न्यायालय संकुलातील ३ विशेष न्यायालयांची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. ही पावले राजकीय व्यक्तींनाही कायद्याच्या समान चौकटीत आणतील, असा सरकारचा दावा आहे.
Not new