
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : जोगेश्वरी पश्चिम येथील माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांनी आज त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी मुलतानी यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
या वेळी आमदार हारुन खान, वर्सोवा विधानसभा समन्वयक बाळा आंबेरकर, तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंगेज मुलतानी यांच्या प्रवेशामुळे जोगेश्वरी–वर्सोवा परिसरात शिवसेनेची ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला.
Congrats
पुढच्या वाटचाली साठि खुप खुप शुभेच्छा