माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर घेणार पत्रकार परिषद!

Share

शिक्षण विभागाची प्रेस प्रत

एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोर्ले

मुंबईतील पवई प्रकरण आता मोठं वळण घेत असून, या प्रकरणाची सुई माजी शिक्षणमंत्री मा. दीपक केसरकर यांच्याकडे वळत असल्याची चर्चा सुरू आहे. रोहित आर्यच्या पोलिस एन्काऊंटरनंतर अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.

रोहित आर्य कोण होता? त्याने मुलांना ओलीस का धरले? आणि ह्या संपूर्ण घटनामागे नेमकं कोणाचं हात आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. चौकशीत असे समोर आले आहे की, रोहित आर्यने शिक्षण क्षेत्रात आपल्या संस्थेमार्फत अनेक चांगली कामे केली होती, ज्यासाठी त्याला केसरकर आणि पंतप्रधान कार्यालयाकडूनही गौरव मिळाला होता.

मग इतका समाजोपयोगी माणूस असे वागेल का? असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिक्षण विभागाकडून सुमारे २ कोटी रुपयांची रक्कम रोहितला देणे होती, आणि तत्पूर्वी काही रक्कम तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी वैयक्तिक खात्यातून दिल्याची माहिती समोर आली आहे.

या सर्व घडामोडींमुळे प्रकरण अधिकच गूढ झाले असून, मा. दीपक केसरकर यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे. या परिषदेत ते आपल्या बाजूचे स्पष्टीकरण देणार असल्याचे कळते.

जनतेत आता उत्सुकता आहे की, या प्रकरणामागचं खरं सत्य काय आहे आणि ते कोणत्या नव्या वळणावर जाणार? कारण एकीकडे रोहित हा पुण्यातील, मराठी कुटुंबातील व्यक्ती होता, तर दुसरीकडे त्याचे शिक्षण विभागाशी असलेले संबंध नव्या चर्चांना तोंड फोडत आहेत.

पुढे या प्रकरणाचे धागेदोरे कोणत्या दिशेने जातात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.दरम्यान शिक्षण विभागाने या बाबत स्पष्टीकरण देत आपले म्हणणे मांडले आहे आणि रोहित आर्या यांच्या संस्थेने परस्पर शाळांकडून आर्थिक व्यवहार केल्याची माहिती दिली आहे.


Share

3 thoughts on “माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर घेणार पत्रकार परिषद!

  1. अशा पत्रकार परिषद घेतल्यावर काही खरं साध्य होत नाही.मात्र,सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हावी.कारण या सरकारचं डोकं ठिकाणावर दिसत नाही. शेवटी पेराल,ते उगवेल…

  2. अशा पत्रकार परिषद घेतल्यावर काही खरं साध्य होत नाही.मात्र,सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हावी.कारण या सरकारचं डोकं ठिकाणावर दिसत नाही. शेवटी पेराल, तेच उगवेल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *