माणिकराव कोकाटे ह्यांच्या “राजीनामाची” मागणी रास्त

Share

.
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई : राज्य कृषी मंत्रि.माणिकराव कोकाटे यांचा विधानसभा कामकाज चालू असताना,ते स्वतः आपल्या मोबाईल रमीचा खेळ खेळतानाचा एक विडीओ पसरला.विधानसभा चालू असताना,शेतकऱ्यांना बाजार भाव नाही मिळत,बनावट बी बियाणे,दलालांपासन होणारी फसवणूक,सावकारी व बँकेचं कर्ज,शेती नुकसान भरपाई न मिळणे, सुका व ओला दुष्काळ पिकाला भाव न मिळाल्याने, शेतकीचा खर्च न निघाल्याने,फक्त आत्महत्या हाच पर्याय त्याचकडे उरतो.हा त्रस्त बळीराजा रोज आपला जीव फासावर लटकत असताना! हे मंत्री त्यांचे प्रश्न विधानात प्रखरपणे मांडायला हवेत.पण तसे न करता हे महोदय! रमी खेळत आहेत. फडणवीस जी आज आपल्या सरकार ला उतरती कळा लागलेली आहे.आपण केलेली कर्माची फळे,ती भोगण्याची वेळ आता आलेली दिसते..हा त्रास दाढीवाले पुष्पांनाही होत आहे.त्यांचे आमदारही नीच कामे करीत आहेत.तर आता पाळी आहे,ती सिंचन घोटाळा आरोपी पवार अजित पवारांची.त्यांचे साथीदारही आता तुमच्या अधोगतीला तयार आहे. माणिकराव कोकाटे ही एक नांदी आहे.आहे देखो होता है क्या? त्यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे.कारण इतक्या जबाबदारीच्या मंत्री पदावर असताना,तुम्ही दिशाहीन सगळ करताय! का तुम्हाला पाठवलंआहे ?
कशाला?आणि तुम्ही करताय काय? शेतकरी फाटक्या कपड्यात आणि तुम्ही सूट बुटात वावरता.तुम्हाला काय म्हणून कृषी मंत्री बनवले तेच कळत नाही. तुम्ही कोणती कोनातून शेतकरी दिसता?त्यामुळे तुमच्या सारख्या आयुष्या लोकांना ह्या पदावर राहण्याचा अधिकारच नाही.बळीराजांसाठी आपण काहीच करताना दिसत नाही उलट उलट कृषी मंत्रिपद असून ही आपण विधानसभेत रम्मी खेळताना विडिओ पसरला त्यानुसार आपल्याला एकाद्या मोबाईल खेळात लहान मुलां प्रमाणे रस असेल तर मग का बरं आपला राजीनामा घ्यायचे नाही? ते सांगा?


Share

3 thoughts on “माणिकराव कोकाटे ह्यांच्या “राजीनामाची” मागणी रास्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *