‘मारिच’ गिधाड हजारोKM प्रवास करून पुन्हा भारतात!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

विदिशा (मध्य प्रदेश) येथून २९ मार्च रोजी उड्डाण केलेले युरेशियन ग्रिफिन गिधाड ‘मारिच’ आता अत्यंत विलक्षण असा लांब पल्ल्याचा प्रवास पूर्ण करून पुन्हा भारतात परतले आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकस्तानमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे भव्य गिधाड राजस्थानमधील धोलपूर येथे पोहोचले आहे.

वन विभाग त्याच्या हालचालींचे सतत निरीक्षण उपग्रह रेडिओ कॉलरद्वारे करत आहे. या प्रवासामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की युरेशियन ग्रिफिन गिधाड ही प्रजाती अविश्वसनीय अशा लांब पल्ल्याच्या उड्डाणांची क्षमता बाळगते.

युरेशियन ग्रिफिन गिधाड ही प्रजाती युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियामध्ये आढळते. हे गिधाड साधारण ९५ ते ११० सेंमी लांबीचे, २.५ ते २.८ मीटर पंखांच्या रुंदीचे आणि ६ ते ११ किलो वजनाचे असते.

‘मारिच’चा हा परतीचा प्रवास पर्यावरणतज्ज्ञांसाठी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरत असून, स्थलांतर पद्धती व संवर्धनाच्या दृष्टीनेही हा प्रवास अभ्यासाचा विषय बनला आहे.


Share

2 thoughts on “‘मारिच’ गिधाड हजारोKM प्रवास करून पुन्हा भारतात!

  1. सध्या ही गिधाड भारतात स्थायिक असल्याने
    ” भारतीय गिधाड म्हणून घोषित ” अशी गिनिज बुकात नोंद करायला हवी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *