
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
इचलकरंजी: मा.काकासाहेब माने मेमोरियल ट्रस्ट इचलकरंजी संचलित मालती माने विद्यालय येथे वृक्ष रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला.
बनी टमटोला विभागाच्या मुलांनी तिरंगा राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक केल्यानंतर तयार झालेल्या राख्या एकमेकाला बांधल्या. त्याचसोबत पर्यावरणाप्रति जागरुकता तयार व्हावी यासाठी चिमुकल्यांनी शाळेतील वृक्षाला राखी बांधून त्यांचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
मुख्याध्यापक संजय रेंदाळकर म्हणाले, ” जगामध्ये असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार आणि अनिर्बंध वापर टाळायला लहान वयातच मुलांवर पर्यावरण स्नेही जगण्याचे संस्कार व्हायला हवेत.” याचे संयोजन बालवाडी प्रमुख ज्योती पाटील यांनी केले होते.
यावेळी सरस्वती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रेखा जाधव, जयश्री मांडवकर, सुप्रिया माने आणि पौर्णिमा साळुंखे आदिंसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनोखाआणि स्तुत्य उपक्रम
Happy Tree Raksha bandhan
असे उपक्रम समाजासाठी चांगले आहेत