प्रतिनिधी:वैशाली महाडिक
मुंबई : मालाड मालवणी पोलिसांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सीपीआय, सीपीएमसह समविचारी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी गुरुवारी (ता. ९) मालवणीत मोर्चा काढला. या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पोलिसांवर आरोप करण्यात आला की काही अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीचे लोक संगनमत करून सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करत आहेत. या अनैतिक साटेलोटीतून समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या नागरिकांना त्रास देऊन त्यांचा “काटा काढण्याचा” प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला.
या बेबंदशाहीचा निषेध करत आंदोलकांनी पोलिसांना मागण्यांचे निवेदन सादर केले. आंदोलनाच्या शिष्टमंडळात रईस शेख, अब्राहम थॉमस, चारुल जोशी, मैमुना मुल्ला, ऍडव्होकेट सईद शेख आणि आसमा शेख यांचा समावेश होता.
Great
Very good