एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई :शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम विभाग आणि मुख्याध्यापक यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट अँन्स हायस्कूल, ओर्लेम, मार्वे रोड, मालाड पश्चिम येथे ९, १० आणि ११ डिसेंबर रोजी भव्य वार्डस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात मालाड पूर्व आणि पश्चिमेतील सुमारे १७० शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि प्रयोगशाळा सहाय्यक सहभागी होत असून, विविध वैज्ञानिक संकल्पना आणि प्रयोगांचे अनोखे प्रकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे विज्ञानप्रेमींसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे.
कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.
१० डिसेंबर रोजी सहशालेय उपक्रमांचे बक्षीस वितरण होईल, तर
११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता विज्ञान प्रदर्शनाचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला शिक्षण विभागाचे अधिकारी, प्रसिद्ध वैज्ञानिक, मान्यवर व्यक्ती आणि टीव्ही कलाकार उपस्थित राहणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Good
Very nice
Good