
प्रतिनिधी : कृष्णा वाघमारे
मुंबई : मालाड च्या फादर एगनेलो हायस्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रियांका काळे -पोलीस निरीक्षक, डॉ. अमृता भाईडकर डॉक्टर, दिवेश गाला व्यावसायिक, सुश्री दीपिका बिटला -समुपदेशक, सुश्री खुशबू कोठारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुरुवात डॉ. अमृता भाईडकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून केली त्यानंतर राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, बायबल वाचन, प्रार्थना आणि वृक्षारोपण केले. पाहुण्यांचे भाषणे आणि गाण्यांनी स्वागत करण्यात आले आणि रोपे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत नृत्य, प्रार्थना गीते, लेझीम आणि पिरॅमिड सारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी देशाचा समृद्ध वारसा आणि संस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवले. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले.सर्व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Wah good
Wahhhh
Wowwww