मालाड पूर्वेतील संजय नगर भागात भीषण आग

Share

प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले

मुंबई : मालाड (पूर्व) येथील पठाणवाडी, संजय नगर आणि पिंप्रीपाडा परिसरात आज दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब डेअरी आणि केमिकलच्या गाळ्यांमधून ही आग सुरू झाली असून, काही क्षणांतच तिने भीषण रूप धारण केले.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक पोहोचण्यास जवळपास एक तासाचा विलंब झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. तोपर्यंत नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण पसरले होते. वस्तीतील अनेक नागरिकांनी आपापल्या घरांतील गॅस सिलिंडर घेऊन सुरक्षित ठिकाणी धावपळ केली.

सुदैवाने, आग लागल्याच्या सुमारे तासाभरानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत १८ ते २० गाळे जळून खाक झाले होते. या आगीत जीवितहानी टळली असली, तरी मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. त्यामुळे गाळेधारक आणि कामगार वर्गासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या भागात वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन अग्निसुरक्षेच्या सोयीसुविधा वाढवाव्यात.


  • आग भीषण होती, अग्निशमन दल उशीरा पोहोचले
  • सुदैवाने जीवितहानी झाली नाही
  • पठाणवाडी, संजय नगर आणि पिंपरीपाडा परिसरात मागील काही वर्षांत अशा अनेक आगीच्या घटना घडल्या आहेत

“साधारणपणे आग १२ वाजताच्या सुमारास लागली, पण अग्निशमन दल पोहोचायला तासाभराचा विलंब झाला. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण या गाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे.”— तबरेज खान स्थानिक रहिवासी



Share

4 thoughts on “मालाड पूर्वेतील संजय नगर भागात भीषण आग

  1. या वषी आगिचे प्रमाण फार वाढले आहे कुठे ना कुठे आग लागली आणि लाखोंचे नुकसान झाले आहे हिच ऐकाला येते पण याआगित गरिबाचे सर्व स्वप्न राख होउन जात हे कधी कोणाला समजणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *