मालाड मध्ये पाणी साचलेआणि गणपती मंडप कोसळले….

Share

प्रतिनिधी : वैशाली महाडिक

मुंबई : चार दिवस सतत च्या पावसाने मालाड पश्चिम लिंक रोड मीठ चौकी येथील साईराज गुरिया पाडा एसआरए बिल्डिंग डी मॉन्टी लेन येथील सार्वजनिक मंडळाच्या गणपती चे मंडप मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने कोसळून पडले सुदैवाने यात कोणीही जख्मी झाले नाही. मात्र सार्वजनिक गणेश मंडळाचे आर्थिक नुकसान झाले.

तसेच मालवणीतील सानेगुरुजी वसाहत १ , २, , ३आणि ५ नंबर येथे  पावसाचे पाणी शिरले  आहे.तसेच एमएच बी कॉलनी मालवणीगेट क्रमांक ८ मालवणी म्हाडा येथील कला विद्यालय परिसर रस्ता आणि आंबोजवाडी परिसर, मढ  येथील  या भागात पावसाचे पाणी साचले होते. एमएचबी कॉलनी समोरील रस्त्यावर असलेले मॅन होल आणि गटाराचे चे झाकण ही उघडे असल्याचे आढळून आले .


Share

3 thoughts on “मालाड मध्ये पाणी साचलेआणि गणपती मंडप कोसळले….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *