
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पी वार्डचे विज्ञान प्रदर्शन शिक्षण निरीक्षक पश्चिम विभाग व पी वार्ड विज्ञान प्रदर्शन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7,8 व 9डिसेंबर 2023 यादरम्यान आयोजित करण्यात आले होते. त्याकरता बी. ए. आर .सी. चे वैज्ञानिक अधिकारी श्री डॉक्टर जे. डी. शर्मा बाल भवन चे माजी संचालक श्री आर.एस.नाईकवाडी, शारदा ज्ञानपीठ शाळेचे अध्यक्ष डॉक्टर शारदा प्रसाद शर्मा,शारदा ज्ञानपीठ शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुष्मिता सावंत , पी वार्ड चे मुख्य निमंत्रक श्री रियाज खान , शिक्षण उपनिरीक्षक श्री धर्मेंद्र नाईक ,सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक श्री संदीप पाटील, दूरदर्शन बालकलाकार मास्टर पलाश प्रजापती आणि डॉक्टर अंकित सुळे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते हे प्रदर्शन सकाळी 9ते सायंकाळी चार पर्यंत सर्वांसाठी खुले होते. या प्रदर्शनाला हजारो विद्यार्थी, शेकडो शिक्षक व पालक यांनी भेट दिली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबरला सुरुवातीला उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, 8 डिसेंबरला सहशालेय पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला तर 9 डिसेंबरला कार्यक्रमाची सांगता होताना विज्ञान प्रदर्शनामध्ये बक्षीस पात्र प्रकल्पांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.अशी माहिती दौलत शाळेचे मुख्याध्यापक गजानन झाडे यांनी दिली.

खूपच छान