मालाड स्थानका लगतच्या दुकानांवर बुलडोजर…!!

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई : मालाड स्थानक लगत च्या काही दुकानांवर पालिकेने बुलडोजर फिरवले. मालाड स्थानक हनुमान मंदिर च्या समोर असलेल्या ७ ते ८ दुकानांवर काही महिन्या पूर्वी मुंबई महानगर पालिकेने रस्ता रुंदीकरणा साठी नोटीस बाजवली होती. त्याचे पालन दुकानदारांनी न करता दुर्लक्ष करत दुकाने सुरूच होती त्यानंतर पालिकेने या दुकान मालकांना प्रत्येकी दिड दिड लाख रुपय दंड ही आकारले होता. त्यानंतर पालिकेने या दुकानांचे विजेचे  कनेकशन ही कापले होते. व हे दुकानदार कारवाई टाळण्याचे प्रयत्न करत होते. मात्र शेवटी मंगळवार दिनांक २२जुलै  रोजी पालिकेने बुलडोजर फिरवत सर्व दुकाने जमीनदोस्त केली आहे. 


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *