प्रतिनिधी : मिलन शहा
मीराभयंदर :मीरा-भाईंदर शहरात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येसोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. मीरा रोड (पूर्व) येथील माशाचापाडा परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने शहर हादरले आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी वस्तीतील महिलांवर आणि तरुणींवर छेडछाड करत परिसरात दहशत माजवली. या प्रकारानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली असून एका तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना आरोपींविरुद्ध कठोर आणि तातडीची कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
Itseems politically influenced event