माहिती अधिकारी अर्चना शंभरकर यांचे निधन

Share

पालघर : जिल्हा माहिती अधिकारी तसेच नवी मुंबई कोकण भवन येथे उपसंचालक (माजी) म्हणून कार्यरत राहिलेल्या अर्चना शंभरकर यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने माहिती व जनसंपर्क विभागात शोककळा पसरली आहे.अर्चना शंभरकर यांचा जन्म २० डिसेंबर १९७३ रोजी चंद्रपूर येथे झाला होता. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांची पालघर जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे कोकण भवन येथील उपसंचालक पदाची जबाबदारीही देण्यात आली होती.

त्यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर आणि दोन मुले असा परिवार आहे.
त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तत्पर, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Share

4 thoughts on “माहिती अधिकारी अर्चना शंभरकर यांचे निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *