मा.सैनिक चंद्रशेखर सावंत यांना कोकणरत्न पुरस्कार जाहीर.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : माजी सैनिक तसेच पश्चिम रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले चंद्रशेखर सावंत यांना नुकताच कोकणरत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मोटरमन म्हणून कार्यरत असताना जुलै २०१८ मध्ये अंधेरी येथील गोखले कोसळत असताना लोकलचे इमर्जेन्सी ब्रेक दाबून मोठी दुर्घटना टाळून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले होते.तेव्हा तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अतुलनिय कार्याचा गौरव म्हणून चंद्रशेखर सावंत यांना कर्तव्यदक्ष मोटरमन पुरस्कार व रोख पाच लाख रुपये बक्षीस दिले. त्यांच्या समाजातील कार्याची दखल घेऊन स्वतंत्र कोकण अभियानातर्फे अध्यक्ष संजय कोकरे यांनी “कोकणरत्न” पदवी पुरस्कार जाहीर केला आहे. ऑक्टोबर महिन्यातच सावंत यांना आदर्श रायगड वृत्तपत्र वर्धापन दिनी “समाजरत्न”पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
सध्या ते महाराष्ट्रातील अग्रेसर असणाऱ्या जॉय ऑफ गिविंग संस्थेचे मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत असून समाजकार्य करीत आहेत.येत्या १३ डिसेंबर रोजी मुंबईत एका भरगच्च कार्यक्रमात सावंत यांना कोकणरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.जाहीर झाल्याने अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.अनेक मानाचे पुरस्कार याआधी सावंत यांना मिळालेले आहेत.


Share

2 thoughts on “मा.सैनिक चंद्रशेखर सावंत यांना कोकणरत्न पुरस्कार जाहीर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *