एसएमएस-प्रतिनिधी-मिलन शहा
मीरा–भाईंदरच्या प्रशासकीय इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जाणार असून, नव्याने सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भव्य नूतन इमारतीचे भूमिपूजन सोमवार, १५ डिसेंबर रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
मीरा–भाईंदर शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढत्या वाहनसंख्येचा विचार करता, स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची गरज गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक व्यक्त करत होते. या मागणीची दखल घेत, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, नागरिकांना परिवहनविषयक कामांसाठी ठाण्याला करावी लागणारी धावपळ, होणारा वेळेचा अपव्यय आणि अतिरिक्त खर्च आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सरनाईक यांनी ही मागणी प्राधान्याने मार्गी लावत MH-58 (मीरा–भाईंदर) या नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थापना केली. सुरुवातीला जागेच्या मर्यादेमुळे इमारत उभारणीला अडथळे येत होते. मात्र, महसूल विभागाकडील जमीन परिवहन विभागाकडे हस्तांतरित करून, सुमारे १५ कोटी रुपये खर्चून सुसज्ज आणि आधुनिक इमारत उभारण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला.
सोमवारी होणाऱ्या या भूमिपूजन समारंभामुळे मीरा–भाईंदरच्या नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्त होणार असून, शहराच्या प्रशासकीय विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
Chaan
Ohhhh
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बांधले ते उत्तमच.परंतु मीरा – भाईंदर मधील स्थानिक नागरिकांच्या गैरसोइ लक्षात घेता. या कार्यालयाशी त्याचा काहीही उपयोग नाही. खरंतर दहिसर टोल नाका ओलांडला की अवजड,चार चाकी व खास करून दुचाकी स्वारांना अतिशय धोकादायक खड्ड्यात असलेल्या रस्त्यांचा सामना करीत जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात मृत्यूमुखी पडले आहेत त्यांनाच अद्याप सरकारी मदत मिळालेली नाही याचीच खंत वाटते.अशात प्रताप सरनाईक यांच्या सारख्या पुढाऱ्यांना स्थानिक मतदारांनी चांगल्या मतधिक्याने निवडून दिले हे पाहता वरील धोकादायक खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आज नितांत गरज आहे…
Good