मीरा–भाईंदरसाठी जलपुरवठा मार्गी; सुर्या जलयोजनेतील अडथळा दूर

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मीरा–भाईंदर शहराच्या सुर्या उपसा जलयोजना (टप्पा–२) मधील तांत्रिक अडथळा अखेर दूर झाला असून मार्च २०२६ पासून शहराला पूर्ण क्षमतेने जलपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत MMRDA, महानगरपालिका आणि महापारेषणचे अधिकारी उपस्थित होते.

योजनेसाठी आवश्यक असणारा १३२ केव्ही उच्च-दाब वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास महापारेषणने मंजुरी दिली असून दिवा मार्गे नवीन पारेषण लाईन आणि ट्रान्सफॉर्मरची उभारणी जलद गतीने सुरू आहे. नव्या वीजदाबामुळे पंपक्षमता १००% होऊन २१८ MLD पाणी मीरा–भाईंदरला मिळणार आहे. हा निर्णय शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


Share

One thought on “मीरा–भाईंदरसाठी जलपुरवठा मार्गी; सुर्या जलयोजनेतील अडथळा दूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *