मुंबईचे ग्रोथ सेंटर फक्त एका उद्योगपती साठी!

Share

file photo

प्रतिनिधी :मिलन शहा

मुंबईचे ग्रोथ सेंटर फक्त एका उद्योगपतीच्या विकासासाठी!!

राज्याला कर्जाच्या खाईत ढकलणारा आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा अर्थसंकल्प..

धारावी येथील आयटीआयला निधी द्यावा काँग्रेस आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांची मागणी..

मुंबई, दि. १२ –
महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प हा जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा आणि कर्जाच्या खाईत लोटणारा आहे. या अर्थसंकल्पात महिला सुरक्षेचा विचार ही करण्यात आला नाही अशी टीका काँग्रेस आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी केली.

एकीकडे राज्य सरकार मेट्रो, महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देत आहे.पण मुंबईत सर्वसामन्य जनतेसाठी आवश्यक असलेल्या बेस्टसाठी पैसे का दिले जात नाही? बेस्टला निधी द्यावा अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली. महायुती सरकार एका उद्योगपतीच्या प्रेमात इतके पडले आहे त्यांना काय देऊ काय नको असे त्यांना वाटत आहे. अर्थसंकल्पात कुर्ला – वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई खारघर, विरार – बोयसर इथे ग्रोथ सेंटर उभे करण्याचे योजना आणली आहे. ही ग्रोथ सेंटर फक्त एका उद्योगपतीच्या विकासासाठी आहे का? असा सवाल आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी उपस्थित केला.
याच उद्योगपतीला 14 कोटी स्क्वेअर फूट जमीन देणार पण धारावीकराना धारावीच्या बाहेर पाठवण्याचा घाट घातला आहे. धारावीकराना मुलुंड, देवनार जिथे डंपिंग ग्राउंड आहे तिथे पाठवत आहे, त्यांचा रोजगार जाणार आहे हे अन्यायकारक आहे अशी टीका काँग्रेस आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी केली.

धारावीच्या आयटीआयला मंजुरी दिली होती. परंतु महायुतीचे सरकार आल्यावर या प्रकल्पाला निधी देण्यात आलेला नाही. अर्थमंत्री अजित पवार यांनी धारावी वर प्रेम दाखवावे आणि धारावी आयटीआयला निधी द्यावी अशी मागणी आमदार गायकवाड यांनी आपल्या भाषणात केली.

महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात महायुतीने दिलेली वचन पाळली नाही. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार असे वचन दिले होते पण ते पूर्ण केले नाही. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले निवडणुकी पूर्वी २ कोटी ३३ लाख ६४ हजार लाभार्थी महिला होत्या. पण फेब्रुवारी मध्ये लाभार्थी महिलांचा आकडा २ कोटी ४७ लाख होता. जर लाभार्थी महिला वाढल्या तर या योजनेचा निधी दहा हजार कोटी कमी का केला? असा सवाल आमदार गायकवाड यांनी उपस्थित केला. सरकारने गेल्या अर्थसंकल्पात केलेल्या शिवभोजन, तीर्थाटन, वृद्धांना पेन्शन वाढ याचे काय झाले याचे उत्तर महाराष्ट्राला मिळाले पाहिजे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *