मुंबईत म्हाडा घरांच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक!

Share

एसएमएस -प्रतिनिधी

मुंबईत म्हाडा घरांच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक! पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक झाले बळी

🔸 मृत व्यक्तींच्या नावावर घर मिळवून देतो म्हणत टोळीने घातला लाखोंचा गंडा

🔸 म्हाडा घर घेणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

मुंबई :म्हाडाची घरे स्वस्तात मिळवून देतो, अशा आमिषाने एका फसवणूक टोळीने आतापर्यंत पोलिस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर तसेच सामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही टोळी मृत व्यक्तींच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून म्हाडा कार्यालयात सादर करत होती आणि नंतर ती घरे लाखो रुपयांत विकली जात होती. काही दिवसांनी पुन्हा तीच घरे “अपात्र” ठरवून घेत पीडितांना बेघर केले जात असे.


फसवणुकीचे बळी :

संतोष भोसले (ATS कॉन्स्टेबल, नागपाडा) – ₹19 लाख

कै. रामनाथ घाडी (कॉन्स्टेबल, अँटॉप हिल) – ₹24.50 लाख

शिरीष सावंत (निवृत्त PSI, कुलाबा) – ₹18 लाख

गणेश लाड (कॉन्स्टेबल, कफ परेड) – ₹28 लाख

राणे (पोलिस बॉडीगार्ड) – ₹27 लाख

दीपक पेडणेकर (सामान्य नागरिक) – ₹36 लाख

डॉ. राजेंद्र धुम्मा (नागपाडा पोलीस हॉस्पिटल) – ₹26 लाख

तसेच इतर अनेक पोलीस व नागरिक


दाखल गुन्हे :

📁 भायखळा पोलीस ठाणे – FIR 295/2016
📁 सायन पोलीस ठाणे – FIR 230/2016
📁 वरळी पोलीस ठाणे – FIR 733/2022
📁 अँटॉप हिल पोलीस ठाणे – FIR 245/2023
📁 तसेच फेब्रुवारी 2025 मध्ये वरळी पोलीस ठाण्यात नव्या गुन्ह्याची नोंद


आरोपींचा डाव :

या टोळीचा प्रमुख श्रीराम शिंदे असून, तो “मृत व्यक्तींच्या नावावर म्हाडा घर मिळवून देतो” असे सांगत लोकांकडून 10 ते 15 लाख रुपये घेत असे.
त्यासाठी बनावट आधार, पॅन कार्ड आणि सरकारी दस्तऐवज तयार केले जात.
आरोपी रुपेश सावंत याचे वडील, निवृत्त पोलीस अधिकारी (कणकवली, सिंधुदुर्ग) असल्याने तेही धमकावणीस मदत करत असल्याचे समोर आले आहे.


मुख्य साक्षीदार :

आदेश मालवणकर, संतोष भोसले, सूरज सावंत, नितीन परब, संजय हजारे, संतोष सुर्वे, राजू राणे, डॉ. राजेंद्र धुम्मा, अजिंक्य घाडी, अमर करंजे, शिरीष सावंत (PSI), दीपक पेडणेकर, कविती हजारे

सावधान – सतर्क राहा!

मुंबईत म्हाडाचे घर घेण्याचा प्रयत्न करत असाल तर कोणत्याही खासगी एजंट किंवा व्यक्तीकडे पैसे देऊ नका.
ही टोळी लोकांना लाखो रुपयांनी फसवून “दोस्ती फ्लेमिंगो” आणि “सिद्धेश ज्योती” सारख्या आलिशान इमारतींमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.


Share

One thought on “मुंबईत म्हाडा घरांच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक!

  1. हे फार मोठे चक्र आहे हे एका दोघानचे काम नाही खुप मोठ उच्च पदावर बसलेले लोक असु शकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *