
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई: भारतीय संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी शिवाजी पार्क, दादर येथे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी,‘संविधान सन्मान महासभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महासभेला बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार असून, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार आणि संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे संविधानाच्या सन्मानार्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिने अभिनेते गौरव मोरे यांनी केले आहे.
महासभा २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५ वाजता पार पडणार असून, या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Very nice
संविधामुळे भारत देशातील एकुणएक नागरिकांना समान हक्क व अधिकार याची तंतोतंत संधी प्राप्त झाली आहेच.परंतु याच संविधानाच्या मूल्यातील जनजागृती व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क (दादर,पश्चिम.)उद्याच्या २५ नोव्हेंबर २०२५ रोजी आपण ‘ संविधान महासभेचे ‘ आयोजन केले गेले आहे ही एक महत्त्वाची तितकीच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.त्यामुळे जमेल किंवा शक्य होईल तितक्या नागरिकांनी या सभेला हजर रहावे ही विनंती.
Gre
जरूर सहभागी व्हावे