प्रतिनिधी:उत्कर्ष बोर्ले
मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने जाणूनबुजून चांगल्या स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींचे बोगस स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या शाळांचे स्थलांतर केल्याचा गंभीर आरोप शिक्षक लोकशाही आघाडी टीडीएफ ने केला आहे. या कृतीमुळे हजारो गोरगरिब विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले असून, अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याची वेळ आल्याचे टीडीएफ अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी सांगितले
टीडीएफ च्या म्हणण्यानुसार, या संदर्भात अनेक तक्रारी देऊनही आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल वारंवार मागूनही उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने मोठे षड्यंत्र रचून धनदांडग्यांचे हित जपले असून शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
जंगले यांनी सांगितले की, “मुंबईतील क्रीडांगणे, उद्याने, इस्पितळे, शाळांसाठी आरक्षित भूखंडांवर झोपडपट्टी पुनर्विकास किंवा व्यावसायिक बांधकामे होऊ नयेत. तसेच शाळांसाठी उंचच उंच इमारती बांधून शिक्षणाची गुणवत्ता घसरू नये.” अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
शिक्षण आता शिक्षण राहिले नाही पैसे कमवणयाचा बाजार झाला आहे गरिबान शिकू नये अशिक्षित रहावे असा या लोकाचे मत झाले आहे तो मजुरच राहिला पाहिजे
Needed
बरोबर