एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई : शिवडी विधानसभेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)–महाराष्ट्र नवनिर्माण सेना–राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाविकास शिवशक्ती आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज लालबाग मार्केट येथे जाहीर सभा पार पडली. या सभेला पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या प्रचारसभेत शिवशक्तीचे उमेदवार श्रद्धा जाधव, भारती पेडणेकर, किरण तावडे, सुप्रिया दळवी आणि सचिन पडवळ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत, मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव सुधीर साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेतून मराठी अस्मिता, मुंबईचा विकास आणि महापालिकेवर शिवशक्तीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.