प्रतिनिधी :मिलन शहा
आत्महत्या करतांना व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत.
उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या वकील सरिता खानचंदानी यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलीय. आत्महत्या करतांनाची दृश्य मोबाईल मध्ये चित्रित झाली आहेत.
सकाळी साडे अकराच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या रोमा अपार्टमेंटच्या टेरेसवरून खानचंदानी यांनी उडी घेतली.पोलीसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत खानचंदानी यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. खानचंदानी यांनी ध्वनी प्रदूषणाबाबत मुंबई हायकोर्टात अनेक जनहित याचिका दाखल करून त्या विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांना अनेक जण ओळखत होते, शिवाय त्यांची मुलगी ही सिने सृष्टीत सुप्रसिद्ध चाईल्ड आर्टिस्ट आहे.त्यांचे पती देखील मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत.
Very sad!!
Very very sad news