मूर्तिकार राम सुतार कालवश!!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले

मुंबई : ज्येष्ठ प्रतिमाकार तथा महान मूर्तिकार राम सुतार यांचे आज वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या सुतार यांनी काल जगाचा निरोप घेतला.

जागतिक व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी २०० हून अधिक पुतळ्यांची निर्मिती केली. त्यांची प्रत्येक कलाकृती ही केवळ शिल्प नसून इतिहास, विचार आणि संवेदनशीलता बोलकीपणे मांडणारी होती. त्यांच्या शिल्पकलेतील बारकावे, भावभावना आणि भव्यता यामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून औपचारिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मूर्तिकलेकडे पूर्णवेळ वाटचाल केली. त्यांच्या हातून घडलेली अनेक शिल्पे देशविदेशात आजही गौरवाने उभी आहेत.राम सुतार यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र व राज्य सरकारतर्फे त्यांना अनेक मानाचे पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आले होते.त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रात एक युग संपले असून, कला विश्वावर शोककळा पसरली आहे.


Share

2 thoughts on “मूर्तिकार राम सुतार कालवश!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *