
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
इचलकरंजी : गतवर्षी संविधान परिवारने शहरभरात लावलेल्या झाडांचा फिरुन आढावा घेत त्यांना खत घालण्यात आले. सायंकाळी ४ ते ६ हा भाग पूर्ण केल्यानंतर लक्षात आले की लावलेल्या झाडांपेकी ६०-७०टक्के झाडे टिकतात.
इचलकरंजी शहरात जी झाडे गायब झाली होती त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे…
१) गाड्यांचे पार्किंग रस्त्यांच्या कडेला होते, ते पार्क करताना झाडांचा विचार करत नाहीत. विशेषत: अवजड वाहने
२) सहवास कट्टे आणि फूटपाथजवळ लावलेली झाडे या ठिकाणी फेरीवाल्यांचे, चहा विक्रेते गाडीवाले अतिक्रमण करतात किंवा गिर्हाईकाची बसणेची व्यवस्था करणेसाठी झाड तोडतात. उदाहरणार्थ राजाराम ग्राउंड जवळ
३) ज्या झाडाजवळ वस्ती नाही तेथे निगराणी न झाल्याने जनावरे खातात.
४) सहवास कट्टे हे घर नसलेल्या लोकांचे निवासस्थान झाल्याने ते त्यावर कपडे टाकतात किंवा साहित्य ठेवतात.त्यानंतर टेरेसवर सेवादल बैठकीत जमणारे साथींसाठी कुंडीत रोपे लावून भेट देण्यासाठी तयारी केली आणि इचलकरंजी जिल्हा बैठकीत ते मैत्री दिवस म्हणून भेट दिली. यासाठी निलेश बनगे, रोहित दळवी, आदिरा आणि संजय रेंदाळकर यांनी प्रयत्न केले.

Verygood initiative
Great initiative