मोहम्मद रफी यांची १०१ वी जयंती साजरी

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले

बॉलीवूड :भारतीय संगीत क्षेत्रात, विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अनोख्या आवाजाने अजरामर ठसा उमटवणारे महान पार्श्वगायक स्व. मोहम्मद रफी यांची आज १०१ वी जयंती साजरी होत आहे.
स्व. मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी तत्कालीन ब्रिटिशकालीन कोटला सुलतानपूर, पंजाब येथे झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड दिसून आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विविध उस्तादांकडे संगीताचे धडे घेण्यासाठी पाठवले. यामुळे ते शास्त्रीय संगीतात पारंगत झाले.
१९४० च्या दशकात रफी मुंबईत आले. सुरुवातीला अनेक अडचणींची सामना करत त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवला. त्यानंतर जवळपास चार दशके त्यांनी हिंदी चित्रपटसंगीतावर निर्विवाद वर्चस्व गाजवले.
या कालखंडात त्यांनी सुवर्णकाळातील अनेक दिग्गज संगीतकार व गीतकारांसोबत काम केले. त्या काळातील जवळपास सर्वच नामवंत नटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. विशेष म्हणजे, समकालीन महान गायक स्व. किशोर कुमार यांच्यासाठीही त्यांनी “रागिणी” या चित्रपटात गीत गायले होते. ही घटना रफी साहेबांच्या मोठेपणाचे आणि कलात्मक महानतेचे उत्तम उदाहरण मानली जाते.
आजही स्व. मोहम्मद रफी यांचे गीतसंगीत रसिकांच्या हृदयात अढळ स्थान राखून आहे.


Share

4 thoughts on “मोहम्मद रफी यांची १०१ वी जयंती साजरी

  1. सुरेल सुरांचा ‘ बादशाह! ‘ स्व. मोहम्मद रफी यांस आमची ” आदरांजली “…

  2. ओम शांति ओम असा महान गायक परत जगात होन शकय नाही

  3. ओम शांति असा महान गायक परत जगात होन शकय नाही ओम शांति

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *