
एसएमएस-प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई :मालाड मालवणी गेट क्रमांक ८ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या काँक्रिटिकरणाच्या कामामुळे बेस्ट बस सेवेला मोठा फटका बसला असून, म्हाडा ते अंबोजवाडीपर्यंत जाणाऱ्या बससेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत. पालिकेने रस्ते खोदकाम सुरू केल्याने बेस्ट बस आता गायकवाड नगरपर्यंतच धावणार असल्याची माहिती बेस्टने त्यांच्या ट्विटर/X हॅन्डलवर दिली आहे.
सध्या ४५६ आणि २७३ क्रमांकाच्या बेस्ट बसचा शेवटचा थांबा म्हाडा वसाहतीजवळ, अंबोजवाडी प्रवेशद्वारापासून काही अंतरावर हलवण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो रहिवाशांना दिड ते दोन किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार, फेरीवाले, विद्यार्थी आणि चाकरमाण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक प्रवाशांच्या मते, बेस्टने गायकवाड नगरहून थेट अंबोजवाडीपर्यंत सेवा वाढवून मोठा दिलासा दिला होता, मात्र अचानकपणे सेवा बंद केल्याने प्रवाशांना पूर्वसूचना मिळालीच नाही. बस आगारात पोहोचल्यावरच सेवा खंडित झाल्याचे कळले. सेवा नेमकी कधीपर्यंत बंद राहील आणि पुन्हा कधी सुरू होईल, याबाबत बेस्टकडून किंवा पालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही, अशी प्रवाशांची तक्रार.
प्रवाशांचे म्हणणे :
“आम्ही अंबोजवाडीच्या शेवटच्या टोकावर राहतो. रोज मालाडला ये-जा करण्यासाठी बेस्टवर अवलंबून असतो. आता पायपीट करावी लागणार असून वेळ आणि त्रास दोन्ही वाढले आहेत.”
— अंजली बाबू डे, रहिवासी अंबोजवाडी
➡ “४५६ क्रमांकाच्या बेस्टने मी रोज गोरेगाव कॉलेजला जात होते. सोयीचे आणि परवडणारे होते. आता वाहतूक कोंडीत वेळ वाया जाणार. परीक्षा जवळ आल्या असताना हे काम का सुरू केले?”
— ईशा सय्यद, बारावीची विद्यार्थिनी
स्थानिक नागरिकांनी पालिका आणि बेस्ट प्रशासनाने तातडीने मार्ग काढून बससेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
Best आणि bmc/Mcgm ने सामान्य नागरिक विशेषकरुन चाकरमान्यन्ना वेठस धरत आहेत