
प्रतिनिधी :मिलन शहा
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर ता. इंदापूर येथे विद्यार्थी विकास मंडळ आणि ॲंटी रॅगिंग समितीच्या संयुक्त विद्यमाने रॅगिंग प्रतिबंधात्मक दिवस व सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राज्यशास्र विभागातील प्राध्यापक धुळदेव वाघमोडे यांनी व्याख्यानात रॅगिंग म्हणजे कायॽ सन १९९९ मध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेल्या डाॅ.आर.के.राघवन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशी व त्यानुसार मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश,सन १९९९ चा महाराष्ट्र राज्य रॅगिंग प्रतिबंधात्मक कायदा, त्यातील विविध कलमे, मा. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने सन २००७,२००९,२०१० या काळात वेळोवेळी दिलेले न्यायालयीन निर्णय, सन २०१५ मध्ये राज्य शासनाने दिलेले निर्देश, सन २०१८ मधील विद्यापीठ अनुदान आयोगाचे परिपत्रक इ. विषयी सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी रॅगिंगविषयी वेगवेगळी उदाहरणे देवून महाविद्यालयात रॅगिंग होणार नाही यासाठी सर्वानी दक्षता द्यावी असे आवाहन केले.
प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ. रामचंद्र पाखरे,सूत्रसंचालन प्रा. सोनाली चव्हाण व आभार प्रा. राम कांबळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग ,प्रा. अमर वाघमोडे,समिती सदस्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Very good initiative
Good