राजकारणात व नियतीमध्ये कटाला काटशह….

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,राजकारण ही वस्तू गलिच्छ असते किंवा राजकरण हे गजकरण असते असे!लोक म्हणतात,ते सत्य आहे. कारण या गोष्टीला आपला इतिहास साक्षी आहे. राजकारणात वडिलांनी मुलांना नाहीतर,मुलांनी बापाला कधीच सोडले नाही. खुर्चीचा नाद अतिशय घातक असतो. आपण पाहत आहात, खास करून महाराष्ट्राच्या राजकारणाला, कोणते ग्रहण लागले आहे, तेच कळत नाही. घड्याळाच्या पेंडलम प्रमाणे, राजकारण ह्या फांदीवरून त्या फांदीवर फिरत आहे. या दोन वर्षाच्या काळात राजकारणाची बरीच उलथा पालत झालेली आहे. कारण प्रत्येकाला सत्तेचा हव्यास आहे.प्रत्येकाला आपल्या सात पिढ्यांचे भलं करायचे आहे.कालच पहा ना! आपण भारताच्या राष्ट्रीय पातळीवर आपण जाऊ! माननीय,शरद रावजी पवार हे फक्त महाराष्ट्राचे नाही, तर ते राष्ट्रीय पातळीवरचे, भीष्माचार्य आहेत. महाराष्ट्रात एकही नेता असा नाही,मग तो कोणत्याही पक्षाचा असो, तो त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत नाही? असं कुणी नाही!मोठे राजकारणी महारथी, हे सुद्धा त्यांच्याकडे नमतात. पण नियती पुढे कुणाचे काहीच चालत नाही, हे सत्य आहे.आज राष्ट्रवादीच्या गोटात सन्नाटा आहे.कारण त्यांचीच घरगुती माणसे घरभेदी झालेली आहेत.अजितदादा पवार यांनी आपल्या निवडक आमदारांसह बीजेपी बरोबर घरोबा केला किंवा मोठा दगाफटका भीष्माचार्यन बरोबर झालेला आहे, यात शंका नाही. पण ह्या घरोब्याने सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामध्ये नुकतीच शिंदे शाही, ही बीजेपीत विलीन झाली. आपल्या 40 साथीदारान बरोबर!.आता या झालेल्या भूकंपाची सुई वळते ती, शिंदे शाही व चाळीस योद्धांकडे. कारण या मंडळीत काही मातब्बर मंडळी आहेत, त्यांना अपेक्षा आहे की भाजपाकडून मंत्रीपदे मिळण्याची? पण ज्याप्रमाणे शिंदे व त्यांच्या साथीदारानवर बीजेपी ने जादूची कांडी फिरवली,सगळे मासे जाळ्यात पकडुन,त्यांनी आपल्या समुद्रात सोडून दिले. कारण शेवटी समुद्र तो चवीला खारट!ते पाणी पचायचे नाही. अशीच अवस्था आता शिंदे शाहीची झालेली दिसते.असे जनमत सांगते. कारण भाजपाने 40 गाजरे दाखवली व त्यांना मंत्रिपदे देऊ, असे आश्वासन दिलेले आहे. मंत्री मंडळाचाही विस्तार करू,असे आश्वासन दिलेले आहे.आश्वासन देण्यात राजकीय मंडळी वस्ताद असतात. आश्वासन पूर्ती कधी व्हायची ते काळच जानो. पण माशाचा पाग घेऊन फिरणाऱ्या भाजप वाल्यांना पुन्हा एका लहान तलावात दहा मासे गळायला लागलेले आहेत, ते म्हणजे अजित दादा व 9 साथीदार! हे मासे पुन्हा त्यांनी, महासागरात सोडले.तेथे आधीच चाळीस मासे प्रतीक्षेत आहेत,त्यांना आता पक्का चाप बसला आहे. भाजपने हे काम इतक्या त्वरित व सफाईदारपणे केले की, कोणाला थांग पत्ता लागला नाही. परंतु यामध्ये बिकट परिस्थिती आहे ती शिंदे गटाची. कारण आधीच त्यांच्या आपसात नाराजीचा सुर असून, त्यामध्ये त्यांच्यात आता तर ह्या आणखीन नऊ जणांची भर पडली असून,त्यांना खाते वाटपही करून,त्यांना मंत्रालयात केबिंनही पटकन मिळाल्या. एवढी जोरदार कृती मात्र शिंदेच्या वेळी झाली नव्हती. तर 40 जणांत नऊ जागा गेल्या! किती उरल्या?उरलेल्या जागेत चाळीस माणसान मधली अपक्ष असतील?शिवाय भाजपचे ही असतील! शिंदे साहेब! किती जणांना शपथविधी घेण्याचा सन्मान मिळतो, या चिंतेत प्रत्येक जण असेल? कारण उद्धव ठाकरे सहेबान बरोबर शिंदे शाहीनी युती तोडली, कारण त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर महाआघाडी केली. म्हणून त्यांनी उद्धव साहेबान बरोबर फारकत घेतली. भाजपासोबत भावी मुख्यमंत्री अजित दादा पवार हा मुख्य मोहरा आहे.पण सध्याच्या शिंदे शाहीला, आता राष्ट्रवादी चालेल का?नाही! त्यांना कोणत्याही परिस्थितीत बीजेपी बरोबर जमवून घ्यावेच लागेल.त्यांना पर्याय नाही. कारण अजित दादा सध्या मुख्यमंत्र्याच्या तोडीस तोड आहेत. ते हुशार व धूर्त आहेत. कारण काकांचे गुण त्यांच्यामध्ये आहेत. बहुतेक नियतीची उलटी गिनती आता सुरू झाली असावी? कदाचित घेतलेली काडीमोड ही शिंदे शाहीला एकटे पडू शकते. मुख्य सुरुंग लागेल तो, मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनाला? कारण एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. दोघांचा भांडण तिसऱ्याचा लाभ! ही खेळी केंद्राची आहे. मैदानात रेडे जुंजवयाचे, कोंबड्यांची झुंजी लावून,त्यावर आपली पोळी नक्कीच हे लोकं महाराष्ट्रात भाजतील. एक अभ्यास करायचा झाल्यास,दूरचित्रवाणीवर पाहून, लोकांनी केला तो म्हणजे! माननीय,राज साहेब ठाकरे,साहेबांनी दूरचित्रवाणीवर दिलेले मनोगत! त्यामध्ये ती चमक नव्हती,जी त्यांच्या शब्दांमध्ये आहे. कारण त्यांच्या शिवाजी पार्कच्या बंगल्यावर अनेक फेऱ्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, यांच्या झाल्या होत्या. लोकांच्या असं वाटलं की, बिरबल की खिचडी पक रही है ? नाहीतर लाल गाजर सत्तेचं, त्यांना दाखवला गेल असेल, पण कालच्या धमाक्यातून हे सगळे बिखरे मोती झालेले आहेत. राज साहेबांचा कालचा मनोगतचा चेहरा अगदी कठीण काळाचा होता.नाहीतर अजित दादांची नक्कल करणे फक्त राज साहेबांना जमते,! आता पुढे काय?


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *