राजकुमार उर्फ जानी…!महान कलाकार.

Share


प्रतिनिधी:सुरेश बोरले

मुंबई,जानी अब हमारे कमाल देखो!इन पैरोंको जमिंपर मत रखो,ये मैले हो जायेंगे!जानी पिस्तोल जेब मे राखो,ये कोई बचोंका खीलोना नाही है!शिषे के मेहेल मे रहने वाले,दुसरोंके घरोपर, पथर नाही फेका करते!अश्या अनेक प्रकारच्या,वाक्य रचनेवर भाश्य करणारे किंवा डायलॉग्ज मारणारे, अशा ह्या आवाजाची ढब, लकब आणि बोलण्याची वेळ ह्या सगळ्यांचा मेळ करून बोलणारे शैलीदार नट व शब्द फेकीचा बादशहा!अर्थातच,स्व.राजकुमार!वाक्य रचनेची शब्दाफेकी करताना,गल्याची धार ही दैवाने दिलेली त्यांना देणगी होती.प्रत्येक चित्रपटात वाक्य रचनंकारा बरोबर सल्ला मसलत करून,ती वाक्य रचना बोलताना,चित्रीकरण करण्यास भाग पाडायचे.असे ते हुंनरी कलाकार होते. स्व.राजकुमार ह्यांचा जन्म 9 ऑक्टोबर, 1929रोजी, फाळणी पूर्वी बलुचिस्तानात झाला.त्यांचं घराण हे काश्मिरी पंडितांचे होते.त्यांच नाव कुलभूषण पंडित अस होत. 1940 साली,हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.येथे आल्यावर, कांहीं वर्षे पोलिस खात्यातही,पोलिस निरीक्षक म्हणून नोकरी केली.परंतु त्यांना अभिनयाची आवड व ते दिसायलाही देखणे असल्याने,त्यांनी पोलिस खात्यातील नोकरी सोडली व फिल्मी जगतामध्ये येण्याचा निर्णय घेतला.1952 साली त्यांना “रंगीला “ह्या चित्रटात संधी मिळाली.दरम्यान त्यांची ओळख, श्रिमती,गायत्री ह्यांच्याशी झाली व ते त्यांच्याशी विवाहबध्द झाले.परंतु त्यांची खरी भरारी,1957 मध्ये आलेल्या स्व.नर्गिस ह्यांच्या अभिनयाने नटलेल्या “मदर इंडिया”ह्या चित्रपट पासून मिळाली.भारतातील पहिला टेकनी कलर सिनेमा,जो की ऑस्कर साठी निवडला गेला.नंतर 40 वर्षे आपल्या फिल्मी कारकीर्दीत,एक वेगळ्या शब्दाफेकीच्या जोरावर अदाकारित घालवली.त्यांनी एकंदरीत 70 हून अधिक चित्रपटांत कामे केलेली आहेत.साधारणपणे 1960 ते 1970 पर्यंत त्यांनी ,चंदेरी दुनिये वर आपली छाप सोडली. त्याकाळी “जानी”हा शब्द अतिशय लोकप्रिय झाला होता.तो ह्यांच्या मुळेच.तर अनेक वाद्यवृंद कार्यक्रमात,विनोदी व नकलाकार त्यांच्या आवजाची,नक्कलही करायचे.त्यामुळे तो ऑर्केस्ट्रा पाहणं एक कुतूहल होत.स्व.मेहबुब खान ह्यांच्या एका हाताने अधू असल्याची भूमिका,मदर इनडियात केल्यावर,त्यांना अनेक चित्रपटांत कामे मिळाली.त्यामध्ये त्यांनी मुक्या नट, करारी खलनायक,काका, नटाचा मित्र,डॉक्टर,पोलिस निरीक्षक अश्या अनेक भूमिका केल्या.असे काही चित्रपट आहेत,ज्यामध्ये त्यांची दिलखेचक भूमिका होती.खास करून,1959 पैगाम स्व,दिलीप कुमार ह्यांच्या सोबत,1963 दिलं एक मंदिर है,1963वक्त,1968नीलकमल,
1969 मर्यादा,1971 लाल पथर,1972 दिलं का राजा.
परंतु दिलं एक मंदिर है,ह्या चित्रपटात उत्कृष्ठ सहायक अभिनेता महणून त्यांना पारितोषिकही मिळाले.एक आजारी इसमाची भूमिका त्यांनी सिनेमात केली होती.तर त्याच साली आलेल्या वक्त ह्या चित्रपटात ही एका श्रीमंत खलनायकाची भूमिका गाजली.उत्तरो उतर काळात,1981कुदरत,1984एक नई पहिली1984मरते दम तक 1989जाबाज अश्या अनेक सिनेमात त्यांनी आपला ठसा उमटवला.परंतु 1991 साली “सौदागर “ह्या चित्रपटात नटवर्य दिलीप कुमार ह्यांच्या सोबत 1959 नंतर, जवळ जवळ 30 वर्षांनी एकत्र येऊन,काम केलं व हा चित्रपट दोघांनी गाजवला. प्रत्येक सिनेमात त्यांची सिगार ओढण्याची एक वेगळीच शैली होती.पण वारंवार ते धूम्रपान करणारे असल्याने,त्यांना गळ्याच्या रोगांनी पछाडले.1990 नंतर त्यांच्या गळ्याची जादू संपली .त्यांची प्रकृतीही खालावली,तरीही त्यांनी 1995 साली गॉड अँड गन ह्या चित्रपटात कामही केले.पण वयाच्या 69 व्यया वर्षी ,3 जुलै 1996 रोजी,त्यांनी आपली जीवयात्रा संपवली.तत्पूर्वी त्यांचा पुतर पुरू राजकुमार ह्याने,चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता.अशा ह्या जानी म्हणून प्रसिद्ध मिळवलेल्यामहान कलाकारला मानाचा सलाम.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *