
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
महाराष्ट्र :खडकवासला येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर उपाध्यक्ष राहुल घुले पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश
खडकवासला येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर उपाध्यक्ष राहुल बाबासाहेब घुले पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला.
यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.
या प्रवेशप्रसंगी शहरप्रमुख गजानन थरकुडे, प्रभागातील उमेदवार शिवाजी मते, सोनाली पोकळे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल घुले पाटील यांच्या प्रवेशामुळे खडकवासला परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
Good