
फोटो :संजय रेंदाळकर मार्गदर्शन करताना
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनी लघुपटांद्वारे जागर कार्यक्रम
इचलकरंजी – भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशाला लोकशाहीमुळेच बळकटी आली असून, लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग, विवेकी आणि जबाबदार युवाची गरज असल्याचे प्रतिपादन जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे राज्य समन्वयक साथी संजय रेंदाळकर यांनी व्यक्त केले.
नाईट काॅलेजच्या सरोजिनीताई खंजिरे सभागृहात आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने विवेकवाहीनी विभागाकडून झालेल्या जागर लोकशाहीचा व्याख्यानास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक डाॅ पोवार यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ माधव पुंडकर यांनी करुन दिली.
संजय रेंदाळकर यांनी संविधान परिवारवतीने महाविद्यालयास ग्रंथभेट दिली.
आपली मांडणी करताना यावेळी शहीद भगतसिंग, लड्डू आणि व फायनल मोमेंट हे लघुपट दाखविण्यात आले. लघुपट संवादात सहभागी युवांना पुस्तके भेट दिली. अध्यक्षीय भाषणात प्रा डाॅ विरुपाक्ष खानाज म्हणाले, ” लोकशाही समजून घेण्यासाठी भवतालाकडे जागरुकपणे पहावे लागेल आणि नव्या बदलांसाठी सज्ज व्हावे लागेल. ही सज्जता संविधानिक मुल्यांतूनच येवू शकते असा विश्वास आजच्या विवेचनात मिळाला आहे.”
यावेळी रोहित दळवी, ओम कोष्टी, यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ जीवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ संतोष साळुंखे यांनी आभार मानले.

Right
Very rightly said