लोकसभा व विधानसभा सदनात ,कडक शिस्ती साठी कायदा व्हावा..??

Share


प्रतिनिधी: सुरेश बोर्ले

भारतात “लोकशाही” आहे की नाही की ठोकशाहीच सुरू आहे.खास करून महाराष्ट्रायाच्या राजकारणात, ज्या सध्या घटना घडत आहेत, टॉवेल बनियान घालून उपहारगृहात मारहाण करणे,नोटांच्या बॅगा दिसणे, विधान भवनात दोन गटात हाणामारी होऊन पोलीस केस होण!काय हे चाललाय काय?तुम्हाला जनतेने का निवडून दिलय कशाला आणि तुम्ही करताय काय?गेली कांहीं दिवस तर महाराष्ट्रातील लोकांना टी व्हि वर ह्या गोष्टींचं मनोरंजन होतय.पण मग असले उद्योग करताना,लोक प्रतिनिधी लोकांची सामाजिक कामे करणार कधी, लोकांचा आणि राज्याचा विकास कधी होणार? यूपी बिहारी वातावरण आता महाराष्ट्र सदनात होत चाललेल आहे.फक्त गोळीबार होऊन, प्राणहानी होण्याची बाकी आहे.ते दिवस लवकरच येईल!कारण आज एका पत्रकार परिषदेत जबरदस्त हाणामारी घटना एका ठिकाणी घडलेली आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री चालू सदनात,आपल्या मोबाईलवर रमी हा जुगार खेळत असतानाचा
वीडीओ सगळीकडे पसरला. त्याचा जाब विचारायला व निवेदन द्यायला गेलेल्या छावा संघटनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना,राष्ट्रवादी फुटीर गटवाध्याननी चोप दिला.ही घटना लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे?तुम्ही सदनात वाईट वागू नका ना? मग अशी निवेदन द्यायची वेळ येणारच नाही?आज आमचा बळीराजा रोज आत्महत्या करतोय!त्याला पिकाला हमीभाव मिळत नाही. मालाला बाजार नाही आणि त्याचे प्रश्न मांडायचे सोडून तुम्ही रमी चालू सदनात खेळताय? हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे व जनतेचे दुर्दैव आहे.लोकहो आता तरी जागे व्हा! योग्य मतदान करा.चालू सदनात कोण विधायक रमी खेळतात,कोण तंबाखू मळून एकमेकांना देतात,कोण झोपा काढतात.याची थोडी तरी लाज शरम मनाची नाही तर,जनाची ततरी ठेवा. जनतेचे विषय मांडा,त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा!की फक्त सरकारी सोयी सवलतींचा आर्थिक लाभ घ्यायचा सरकारी,गाड्या,विमाने,
हेलिकॉप्टर हवेत उडवायची.
जनता मात्र उपाशी तुम्ही खाता तुपाशी!ही गत आहे.ती लोकसभा सदनातही आहे.सदन सुरू आहे.अनेक खासदार व मंत्री मस्त झोपा काढतात.ही दृश्य टीव्हि वर दिसतात.एक नेहरू काँग्रेसी घराण्याचे राजपुत्रतर चक्क झोपताना दिसलेत.काय तुम्ही जनतेच धिंडवडे काढताय.दोन्ही सादनांमध्ये आता कॅमेरे आहेत,त्यामुळे प्रत्येक हालचाल टिपली जाते.जे कोणी मंत्री, संत्री, आमदार खासदार असतील त्यांना एकदा ते दोनदा ताकीत देऊन सरळ निलंबनाची कारवाई करावी.हा कायदाच पास करा. कारण जनताच आपला पैसा वापरून आपल्या भल्यासाठी, तुम्हाला निवडून देते.आपण ह्या जनतेचे असे पांग फेडत आहात?हे आपणास आपल्या पक्षातील पुढाऱ्यांना शोभते का?
मा.पंतप्रधान आपण अनेक देश फिरला आहात!तेथील संस्कृती व शिस्त आपण जवळून पाहिली आहे.ती आता भारतात लोकशाही टिकविण्यासाठी अनुकारीत करा.कारण ह्याचा सगळा परिणाम शेवटी आपल्यावरच व तुमच्या पक्षावर होणार आहे.तुमच्या राजवटीत जनता महागाई व अशा अनागोंदी कारभाराने,आता विटली आहे.खास करून महाराष्ट्रातील येणारा काळ तुमच्या पक्षासाठी आव्हानच! आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिपुतरांच्या विरोधी कारवायांनी,महाराष्ट्रात क्रांती होणार आहे आणि ही क्रांती जेवढे तुम्ही फोडाफोडी करून जमविलेले आहात. त्यांच्याविरुद्ध मोठ्या जोमाने होणार आहे.ही तुमच्या पक्षाच्या बदलाची नांदी असेल.कारण अती अत्याचार मग क्रांती!हा जगाचा निसर्गाचा नियमच आहे.हे.


Share

3 thoughts on “लोकसभा व विधानसभा सदनात ,कडक शिस्ती साठी कायदा व्हावा..??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *