
प्रतिनिधी:एन.एस. सय्यद
मुंबई, विशेष शाखेच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक उषा प्रशांत सुराडकर या दीर्घ काळा पासून कॅन्सर या आजाराने त्रस्त होत्या त्यांचा उपचारा दरम्यान आज पहाटे 4 वाजताच्या दरम्यान फोरटीज रुग्णालयात निधन झाला. त्यांची प्रतिनियुक्ती भरोसा कक्ष गुन्हे शाखा ठाणे येथे होती. त्यांची अंत्य यात्रा सकाळी 11 वाजता राहते घर न्यू पोलीस टॉवर, भास्कर इमारत,ठाणे पोलीस स्कुल,ठसने येथून निघणार असल्याची माहिती त्यांचे पती प्रशांत सुतार सुराडकर यांनी दिली आहे. त्यांच्या अचानक मृत्यू ने पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे.