प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई: मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांना पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली व महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांनी दणदणीत विजय मिळवला. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी विधानसभेप्रमाणे लोकसभाही गाजवली. खासदारकीच्या एका वर्षात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना संसदरत्न पुरस्कारने सन्मानीत केले. काँग्रेसच्या या रणरागिणीने देशाच्या संसदेत मुंबईचा आवाज बुलंद केला, असे काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
प्रा. वर्षा गायकवाड यांनी धारावी विधानसभा मतदार संघातून सलग चारवेळा विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. जनतेच्या कामासाठी त्या नेहमी उपलब्ध असतात व कशाचीही पर्वा न करता रत्यावरची लढाईही त्या हिरीरीने लढत आहेत, त्यांनी नेहमीच लोकांच्या प्रश्न होती घेऊन विविध आंदोलनेही केली आहेत. लोकसभेत पहिल्यांदाच गेल्या असल्या तरी विविध विषय मांडून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. केवळ आपल्या मतदार संघातीलच प्रश्न मांडून त्या थांबल्या नाहीत तर मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न त्यांनी मांडले. वर्षाताईंचे कठोर परिश्रम, सखोल ज्ञान, जिद्द, चिकाटी आणि जबाबदाऱ्या हाताळण्यातील कार्यक्षमता तसेच न डगमगता थेट भिडण्याचा स्वभाव यामुळेच त्यांनी उल्लेखनीय यश मिळाले आहे.
प्रा. वर्षा गायकवाड यांच्या रुपाने काँग्रेस पक्षाला तसेच मुंबईला एक अत्यंत प्रभावी नेतृत्व मिळालेले आहे. लोकनेते एकनाथराव गायकवाड यांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक कार्याचा वारसा खासदार वर्षा गायकवाड यांना लाभाला आहे, तोच वारसा खासदार त्या चालवत आहेत, हेच कार्य त्या पुढेही चालू ठेवतील असा विश्वास राजहंस यांनी व्यक्त केला आहे.
Good