प्रतिनिधी : वैशाली महाडिक
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग भाषा संचालनालयवतीने काल वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन प्रेरकांचे आभासी संमेलन संपन्न झाले. यामध्ये महाराष्ट्रातील वाचनसंस्कृती जपणारे ३० शिलेदार म्हणजे प्रेरकांना मांडणी करण्याची संधी दिली गेली.
हे आभासी संमेलन आम्हां अनेक पुस्तकवेड्यांना एकत्र आणणारे आणि एकमेकाला कामाच्या नव्या दिशांना जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे होते. सहभाग संधीबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली. वाचन प्रेरकांच्या आभासी संमेलनाने आम्हांस प्रेरणा मिळाली. वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी नवनवीन कल्पना समजल्या.
यामध्ये आपण सृजन वाचनकट्टा, पुस्तकभिशी, फटाके नको पुस्तक हवे अभियान, पुस्तक वाचन परीक्षा, अक्षरवेल प्रकल्प याबद्दल मांडणी केली. यावेळी अध्यक्षस्थानी भाषा संचालक,तथा अन्य पदाधिकारी, नामवंत प्रकाशक, वितरक उपस्थित होते. भारत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
Good