

प्रतिनिधी :वैशाली महाडिक
बारामती ते सणसर – दिंडी मार्ग : दिंडी क्र 261
रविवार दि 7 जुलै 2024 रोजी एक दिवस तरी वारी अनुभवावी (वर्ष 11वे) उपक्रमांतर्गत बारामती ते सणसर या टप्प्यात चालण्याचा अनुभव घेतला. तुकोबारायांच्या पालखीसोबत चालण्याचा अनुभव प्रतिवर्षी घेताना एक वेगळाच आनंद मिळतो. महाराष्ट्रातील पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्ते मंडळी यात सहभागी होतात आणि संविधान समता दिंडी स्वरुपात प्रबोधन करतात. यात तरुण-तरुणींनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणे आवश्यक आहे. कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हा महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे.
महत्वाचे म्हणजे यात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचेसोबत चालण्याचा अपुर्व आनंद आज आम्हाला मिळाला आहे. यामध्ये इचलकरंजीतून दिंडी प्रमुख अमोल पाटील, संघटक रोहित दळवी, मासूमच्या रुचिता पाटील, अनुभव कोल्हापूरच्या जिल्हा कार्याध्यक्ष स्नेहल माळी, संवेदनाचे दामोदर कोळी, उर्मिला कांबळे ,ओम कोष्टी आणि संजय रेंदाळकर सहभागी झाले होते.
