
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथील यशोधाम हायस्कूल आणि मालवणीच्या मदर टेरेसा स्कूलची मुले सहलीवरून परत येताना वसई परिसरात तीव्र ट्रॅफिक जॅममध्ये अडकली होती.
संध्याकाळी ६ वाजता निघालेल्या बस रात्री १२ नंतरही हलल्या नव्हत्या — जवळपास ५०० विद्यार्थी या कोंडीत अडकले होते.
ही बाब भाजपा पूर्व मढ मंडळ उपाध्यक्ष मंगेश चौधरी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ पुढाकार घेतला, रात्री २ वाजता ७० दुचाकीस्वारांच्या टीमसह वसईकडे धाव घेतली.
RTO आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी ट्रॅफिकमधून मार्ग काढत सर्व मुलांना सकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरक्षितपणे शाळेत पोहोचवले.
रात्रभर मुलं न आल्याने चिंतेत असलेल्या पालकांचा आनंद मुलांना पाहताच गगनात मावेनासा झाला.
मंगेश चौधरी आणि त्यांच्या टीमच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कामगिरी बद्दल पोलिसाचे मना पासुन आभार व सलाम
Very pathetic