
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोर्ले
मंबई :इंडियन स्कूल ऑफ मीडिया (ISM) च्या विद्यार्थ्यांनी ‘विंग्स ऑफ जॉय’ या उपक्रमांतर्गत एनएमएमसीच्या ईटिसी सेंटरमधील १४८ विशेष सक्षम मुलांसाठी क्रीडा दिनाचे नुकतेच आयोजन केले. बॉल अँड द बास्केट, म्युझिकल चेअर्स यांसारख्या अनुकूलित खेळांमध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुमीत शिंदे (डायरेक्टर – चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर व अध्यक्ष – चाईल्ड रिअॅक्ट फाऊंडेशन) होते. प्रत्येक मुलाला पदक, प्रमाणपत्र आणि गिफ्ट व्हाउचर देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात आला.डेकॅथलॉन, एनएमएमसी, ईटिसी सेंटर, चाईल्ड रिअॅक्ट फाऊंडेशन आणि संस्कृती उत्सव यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. आयएसएम टीमचा संदेश साधा होता— “या मुलांमध्ये प्रतिभा कमी नाही; त्यांना वेगळं न वागवता प्रोत्साहन द्या.”
डेकॅथलॉन, एनएमएमसी, इटीसी सेंटर, चाईल्ड रिअँक्ट फाउंडेशन तसेच संस्कृती उत्सव यांच्यासारख्या अनेक संस्था आहेत त्यांनी देखील विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे सहकार्य करून येणाऱ्या तरुण पिढीला प्रोत्साहन देऊन सहकार्य करून विद्यार्थी घडवायला हवेत…
Verygood initiative