
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
इचलकरंजी : सांस्कृतिक क्षेत्रात विविध प्रकारच्या विद्वेषी फाईल्स येत असताना अशावेळी सद्भावाचे आगमन महत्वपूर्ण ठरणार आहे, असे मत प्रसिद्ध चित्रपट समीक्षक डॉ अनमोल कोठडिया यांनी सद्भाव लघुपट उत्सवात व्यक्त केले.
शालोम चर्च, संविधान परिवार, आणि सद्भाव मंच, महाराष्ट्रवतीने आयोजित सद्भाव लघुपट उत्सवाचे प्रसंगी प्रा.अमित कोवे यांनी स्वागत केले. प्रेमलता आढाव यांनी प्रास्ताविक केले. रोहित दळवी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. पुस्तक आणि झाड देवून पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विवेकदीप वाचनालयाचे उद्घाटन सिंधुदुर्गचे गटविकास अधिकारी तन्मय मांडरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांना संविधान प्रास्ताविका आणि पुस्तक संच देवून त्यांचा संविधान परिवारवतीने सत्कार करण्यात आला. वाचनालय आणि सद्भाव लघुपट उत्सव यासारखे कार्यक्रम समाजाला निरोगी ठेवण्याचे काम करतात असे म्हणत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि अशा गोष्टींना समाजाने मदत करायला हवी असे आवाहन केले.
लघुपट उत्सवात लड्डू, उमज, आगमन आणि द फायनल मोमेंट या कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले. त्यासाठी सर्वेश होगाडे आणि दामोदर कोळी यांचा सत्कार करण्यात आला. या फिल्मचा रसास्वाद आणि समीक्षण डॉ. अनमोल कोठडिया यांनी केले.
याप्रसंगी संजय आढाव ,साद चांदकोटी, गौरी कोळेकर, अशोक चौगुले, अशोक वरुटे, अमोल पाटील, स्नेहल माळी, विभावरी नकाते, रुचिता पाटील, निलेश बनगे, सौरभ पोवार, अद्वय आढाव, ताहीर शेख, सुनिल पोवार, अशोक चौगुले, सुवर्णा कानडे, प्रथमेश ढवळे, प्रभा यादव, मुस्तफा शिकलगार, आरीफ पानारी आदिंसह रसिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय रेंदाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर वैभवी आढाव यांनी आभार मानले.
Good
खूपच चांगला उपक्रम
Gd
Good