प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
मुंबई: विरोध”हा शब्दच सगळ्या गोष्टी व संवेदना थांबवतो.कारण हा शब्द नेहमीच न पटणाऱ्या समसेवर मांजरीप्रणे आडवा जातो व वादाला तोंड फुटते.त्यातूनच काहीतरी चांगले निष्पन्न होते.त्यामुळे विरोध हा कोणत्याही क्षेत्रात असावा.नुसता असावा असा नाही तो कडवा असावा.आपल्या विधानावर ठाम असावा.जर चांगला परिणाम आपल्याला हवा असल्यास.सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेचे पावसाळी अधिवेशनही संपत आलेलं आहे आणि सदनात विरोधी नेताच नाही.हे काय गौडबंगाल आहे. म्हणजे सत्तेतील सरकारला कोणताही कायदा करताना व त्याचा निर्णय घेताना,तो एकमताने एकतर्फी पास करायचा आहे का?त्यावर विरोध कुणाचाही नसावा! भले त्यामध्ये जनतेच नुकसान झाले तरही चालेल.पण कोणताही निर्णय एकतर्फी व्हावा ही भाजपची खेळी आहे.प्रत्येक सदनात विरोधी नेता हा असतोच,त्या संबंधी विधानसभेत अनेक वेळा पत्र व्यवहार ही करण्यात आला.विनंत्याही अधक्ष्य महोदयांना अनेक वेळा करण्यात आल्या! पण त्यांची त्याबाबत चालढकल चाललेली आहे. कारण विरोध हा सक्तीचा आहे!जर तुम्हाला सशक्त व चांगला अभ्यासू जनहिताचा निर्णय हवा असल्यास,तो निर्णय अनेक टप्प्यातून,अनेक चर्चेतून,चर्चा धुमशानातून,संघर्षातून तापून सुलाखून गाळून निघतो. मगच त्यातून चांगले निष्पन्न होते.हिंदी भाषेची शक्ती विषय घ्याना! हे ताजे उदाहरण आहे.सगळे आपला पक्ष सोडून,मराठी साठी एकत्रित आले.त्यामुळे शेवटी सरकारला दोन्ही जी आर रद्द करावेच लागले ही ताकद विरोधात आहे.कारण विरोध हा जितका जहाल,तितकाच निष्कर्षित निर्णय चांगला.मग ते कोणतही क्षेत्र असो.निर्णय हा अनेक टप्प्यातून जातो व निर्णय तो दाणेदार असतो.जनहिताचा असतो. त्यामुळे विरोध हा असावाच. आता तर तो विधान भवनात असावाच लागेल!हिंदी भाषेची सक्ती दाबली गेल्याने, दिल्लीकर नक्कीच महाराष्ट्रावर नाराज आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात,भाजपा नक्कीच षडयंत्र, कुरघोड्या करणार व त्याला सडेतोड उत्तर ही विरोधानेच देता येणार.त्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावे..
असायला हवलोकशाही गई गरज आहे LOP