
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : माजी शिक्षक तथा एनसीसी अधिकारी
चंद्रकांत म्हात्रे हे निवृत्त झाले तरी त्यांना स्वच्छता केली नाही तर चैन पडत नाही.काल दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता सायन चुनाभट्टी येथून थेट जूहू चौपाटीवर साफसफाई करण्यासाठी पोहचले.
तिथे सालाबादप्रमाणे या वर्षीही खूप सामाजिक संस्था, संघटना आणि राजकारणी नेत्यांची गर्दी होती.
तिथे एन सी सी छात्र सैनिक आर.एस.पी. आणि स्काऊट
आणि गाईडचे विद्यार्थी आणि विविध महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.एन सी सी अधिकारी चंद्रकांत म्हात्रे यांनी सेंट लॉरेन्स हायस्कूल सांताक्रुझ मुंबई येथील छात्र सैनिकांना सोबत घेऊन साफसफाई केली.गणपतीचे अवशेष, निर्माल्य, पुठ्ठे, लाकडी मखर फुलांच्या माळा इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आणि निर्माल्य साफ केला एकूण २ ते टन एवढा कचरा गोळा केला आणि महानगरपालिकेच्या चौपाटीवर गाड्या फिरत होत्या त्या मध्ये टाकून दिला.
Proud to all of these students. God bless you students. Good job.
Proud to all these students. God bless you. Good job.
Very nice
Very nice
Good