
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड होणे अपेक्षित असतानाही अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. याबाबत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन स्मरणपत्र सादर केले.
या वेळी शिष्टमंडळात पक्षाचे विधीमंडळ गटनेते आदित्य ठाकरे, विधानसभा गटनेते भास्कर जाधव, विधानपरिषद गटनेते ॲड. अनिल परब, आमदार अजय चौधरी, आमदार वरुण सरदेसाई, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार महेश सावंत, आमदार कैलास पाटील आणि आमदार संजय देरकर उपस्थित होते.
राज्यातील लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षनेत्याचे पद महत्त्वाचे असून, ते लवकरात लवकर भरावे, अशी मागणी या स्मरणपत्रातून करण्यात आली आहे. विरोधी पक्षाचा आवाज प्रभावीपणे मांडण्यासाठी या पदाची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
Good